१९९३
शुभारंभ
पहिल्याच वर्षा पासून, किसानने नव्या कल्पना आणि शोधांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ठिबक सिंचनापासून ते ड्रोनपर्यंत, ज्यामुळे शेतीत अचूकता, कार्यक्षमता आणि प्रगतीचे नवे पर्व सुरू झाले.

१९९५
प्रतिसाद कल्पनेपलीकडचा
कल्पनेच्या पलीकडचा प्रतिसाद — पहिल्यांदाच २,००,००० हून अधिक शेतकरी किसानमध्ये सहभागी झाले. बहुभाषिक लोकांची किसानला उपस्थिती.
एक नवे आव्हान, एक नवी जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याशी त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधण्याची.

१९९७
अस्सल शेतकरी, योग्य परिणाम
शेतकऱ्यांनी किसानला भरघोस प्र तिसाद दिला. किसानने आपल्या अस्सल शेतकरी मित्रांचं मनःपूर्वक स्वागत केलं. किसान प्रदर्शनाची खरी किंमत जाणलेल्या शेतकऱ्यांनी पैसे देऊन तिकीट घ्यायची तयारी दाखवली.

१९९८
नवा प्रयोग
नवा अनुभव

किसानला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची आणि व्यावसायिकांची नोंदणी चालू करण्यात आली. ज्यामुळे भेट देणाऱ्यांच्या अपेक्षा समजून घेता आल्या आणि प्रदर्शनाचा अनुभव अधिक चांगला झाला.
२०००
नेहमीच
शेतकरी प्रथम
किसानसाठी नेहमीच आपले शेतकरी हेच प्रमुख पाहुणे, तेच खरे नायक. पहिल्या द िवशी सकाळी ९ वाजता, शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची परंपरा सुरु झाली.

२०००
‘संपर्क’ अभियान
वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी ‘टोयोटा’च्या सहकार्याने सुरू झाले पहिले
‘संपर्क’ अभियान. देशभरातील कृषी विक्रेत्यांशी संवाद साधणारी हि यात्रा आजही सुरू आहे!

२००१
किसान संपर्क
फक्त १ रुपयात
‘वनइंडिया प्लॅन’मुळे देशभरात कॉलचे दर फक्त १ रुपया झाले,
आणि किसानला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणखी सोपे झाले.

२००४
जागा बदलली पण प्रतिसाद वाढला
शेतकऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीऐवजी वैयक्तिक वाहतुकीला प्राधान्य दिले. वाहतुकीच्या सोयीसाठी किसान शहराबाहेर स्थलांतरित झाले. PIECC येथे तब्बल
३० एकर जागेवर विशेष पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली.

२००५
शेतकऱ्यांशी
पत्रव्यवहार
२ लाख इनलँड पत्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली — किसानची माहिती थेट शेतकऱ्यांच्या हातात!

२००६
किसानला एअरटेलची साथ
पूर्वनोंदणीची सुरुवात झाली एका साध्या “K” एसएमएसने. प्रत्येक एसएमएस पाठवलेल्या शेतकऱ्याला फोन करून माहिती नोंदवण्यात आली आणि एसएमएसद्वारे पास पाठविण्यात आला. स्मार्टफोनची सुरवात झाल्यावर ऑनलाइन नोंदणीही सुरु झाली!

२०१३
पूर्वनोंदणी
सुरु
भेट देणाऱ्यांच्या
संख्येत वाढ

प्रत्यक्ष प्रदर्शन सुरू होण्याच्या आधीपासूनच शेतकरी नोंदणी करू लागले.
या प्रक्रियेमुळे एक मजबूत डेटाबँक तयार झाली — ज्यात आता 20 लाखांहून
अधिक शेतकऱ्यांची माहिती आहे आणि हा आकडा दरवर्षी वाढत आहे!
2015
Booked Before It Began
100+ stalls booked online — even before day one! Farmers lined up, eager and early. Behind the scenes, our DataBank was born —
built manually, passionately, farmer by farmer.

२०१६
स्मार्ट शेतकरी,
स्मार्ट किसान
नोटबंदी नंतर डिजिटल पेमेंट्स प्रचलित झाली. आपले शेतकरीसुद्धा बदलत्या काळाशी जुळवून घेत स्मार्ट पेमेंट्सचा वापर करू लागले.

२०१७
डिजिटल संपर्क
वर्ष भर
UPI व्यवहार वाढत गेले तशी पूर्वनोंदणीही वाढत गेली! किसान आणि शेतकऱ्यांमध्ये वर्षभर माहितीची देवाणघेवाण होत राहिली.

२०२१
नवी वाट नवा अनुभव
१००० पेक्षा जास्त वेबिनार्स बनले शेतकरी आणि कृषी व्यवसायातला दुवा.
योग्य वेळी योग्य ती माहिती, आणि नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले अगदी घरबसल्या.


३३ वर्षांची वाटचाल
शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसोबत
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, त्यातून निर्माण होणाऱ्या संधी
आणि शेतकरी यांना जोडणारा दुवा.
१९९३
बदलाचे
बीज
निरपेक्ष मनाने आणि खूप उत्सुकतेने, किसानने भारतातील पहिले खाजगी कृषी प्रदर्शन सुरू केले. ना कोणता डेटा, ना अंदाज — फक्त एकच महत्वाचा प्रश्न, “शेतकरी येतील का?” आणि ते आले. हजारोंच्या संख्येने आले. देशभरातून आले आणि बदलाचे बी पेरले गेले



