top of page

जागर 

शेतातील माती + पाणी + बीज
शेतकऱ्यांचे आरोग्य + आनंद

या क्षेत्रात तुम्ही काम करताय ?
२ लाख शेतकऱ्यांशी थेट संवाद साधायचाय ?

Artboard 2.png

सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या  निवडक १० संस्थांना किसान जागर उपक्रम ही संधी उपलब्ध करून देत आहे.

Bhujal image.jpg

भूजल  

शेतकऱ्यांना पावसाचे पाणी साठवण्यासाठी डोंगर उतारावर खड्डे, आणि छोटे बंधारे यांसारख्या पद्धती वापरून भूजल पुनर्भरण करण्यासाठी मार्गदर्शन करा.

या पद्धती पाण्याची पातळी पुनर्संचयित करतात, पीकाला आधार देतात, आणि दीर्घकालीन शाश्वत शेती सुनिश्चित करतात.

AdobeStock_976674669.jpeg

माती

शेतकऱ्यांना सेंद्रिय खत, पीकांचे फेरबदल आणि मातीची धूप रोखण्याच्या पद्धतींचा वापर करून मातीची सुपीकता राखण्यासाठी मार्गदर्शन करा. यामुळे जास्त उत्पन्न मिळते, शेती टिकाऊ राहते आणि भविष्यातील पिकांसाठी मजबूत पर्यावरण तयार होते.

Story of seed 2 (1).jpg

बियाणे 

शेतकऱ्यांमध्ये दर्जेदार बियाणे निवडण्याबाबत जागरूकता पसरवा, ज्यात अंकुरण क्षमता, रोगप्रतिकारकता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यावर भर असेल. मजबूत बियाण्यांमुळे पिके निरोगी राहतात, उत्पादन जास्त होते आणि शेतकरी समुदायासाठी शाश्वत भविष्यात मदत होते.

bee.png

मधमाशी पालन : परागीकरण 

ह्या उपक्रमाचा उद्देश शेतकरी, उद्योग व अधिकारी यांना मधमाश्यांचे शेतीतील महत्त्व समजावणे आहे. परागीकरणाने पिके वाढतात हे दाखवून मधमाशीपूरक शेतीचे सोपे उपाय सादर करू शकता.

Firefly_Close-up of hand holding medicines on table 855821.jpg

आरोग्य

हा उपक्रम जनरल औषधे, प्रतिबंधात्मक आरोग्य काळजी, आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवून ते वैद्यकीय खर्च कमी करू शकतात, सुदृढ राहू शकतात, आणि त्यांच्या कुटुंबासाठी उत्तम जीवनमान सुनिश्चित करू शकतात.

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य क्षेत्रात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी शेतकऱ्यांना तणाव कमी करण्याचे उपाय, आनंदी जीवनशैली आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग्य सवयी यांची माहिती द्यावी.

Firefly_happy farmers family in indian farms 957943.png
20044.jpg

कचरा व्यवस्थापन 

शेतकऱ्यांना दैनंदिन कचरा वेगळा करण्यास आणि पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्यास प्रोत्साहित करा.

या सोप्या पद्धतींबद्दल जागरूकता पसरवल्याने प्रदूषण कमी होते, कचऱ्याचे कार्यक्षम व्यवस्थापन होते, आणि स्वच्छ व निरोगी गावांची निर्मिती होते.

कृपया नोंद घ्या 

  • माहिती सादर करण्याची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२५

  • अधिक माहिती हवी असल्यास किसानचा प्रतिनिधी आपणाशी संपर्क साधेल. 

  • आम्ही खाली प्राधान्य क्षेत्रांची सूची दिली आहे.
    आपले काम वेगळ्या क्षेत्रात असले तरी विचारात घेतले जाईल.

  • आयोजन समिती आपल्या अर्जावर विचार करून
    १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्णय कळवेल.

प्राधान्य

शेतीसाठी

शेतकऱ्यांसाठी

भूजल

आरोग्य

माती

कचरा व्यवस्थापन

बियाणे

मानसिक आरोग्य

मधमाशी पालन : परागीकरण

  • माहिती सादर करण्याची अंतिम तारीख: 
    १५ ऑक्टोबर २०२५

  • अधिक माहिती हवी असल्यास किसानचा प्रतिनिधी आपणाशी संपर्क साधेल. 

  • आम्ही खाली प्राधान्य क्षेत्रांची सूची दिली आहे.
    आपले काम वेगळ्या क्षेत्रात असले तरी विचारात घेतले जाईल.

  • आयोजन समिती आपल्या अर्जावर विचार करून
    १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्णय कळवेल.

Jagar ad copy.png

नियम व अटी लागू

  • आपल्या किसान प्रदर्शनातील सहभागासाठी जागा / स्टॉल निशुल्क उपलब्ध करून दिला जाईल. त्याशिवाय कोणतीही आर्थिक मदत केली जाणार नाही.

  • स्टॉल किंवा जागा हि फक्त माहिती प्रदर्शित करण्यासाठी व थेट संवाद साधण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कुठल्याही प्रकारच्या विक्रीस परवानगी नाही. 

  • किसान प्रदर्शनात पाचही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • आयोजकांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे.

  • स्टॉल रिकामा ठेवणे किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांना तो स्टॉल रद्द करण्याचा अधिकार राहील.

  • सहभागी संस्थांनकडून अनामत रक्कम घेतली जाऊ शकते. हि रक्कम प्रदर्शन संपल्यावर २ दिवसात परत केली जाईल.

सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर

Jagar ad.png

जागर 

शेतातील माती + पाणी + बीज
शेतकऱ्यांचे आरोग्य + आनंद

या क्षेत्रात तुम्ही काम करताय ?
२ लाख शेतकऱ्यांशी थेट संवाद साधायचाय ?


शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या
निवडक १० संस्थांना किसान जागर उपक्रम
ही संधी उपलब्ध करून देत आहे. 

सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर

bottom of page