आमच्या विषयी


किसान फोरम गेली २४ वर्षे कृषि विस्तार क्षेत्रात सक्रिय आहे
आमचा उद्देश नवीनतम तंत्रज्ञान व संकल्पना शेती समुदायापर्यंत पोहोचवून, 
त्यांना शेतीतील उदयोन्मुख संधी प्राप्त करून देणे हा आहे. याच हेतूने 
किसान प्रदर्शनाचे आयोजन होत आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी 
आम्ही मोठ्या प्रमाणात काही प्रकल्प राबवीत आहोत.  
यापैकी काही खालील प्रमाणे आहेत:


किसान: भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शनकिसानची स्थापना १९९३ साली एका संस्थेच्या रुपात झाली. शेतकऱ्यांसाठी 'किसान'९३ हे  
पुण्यातील पहिले प्रदर्शन होते. या प्रदर्शनाला महाराष्ट्र व आजूबाजूच्या इतर राज्यातील शेतकरी  
समुदायांनीही मोठा प्रतिसाद दिला. पहिल्यापासूनच कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांच्या प्रेमामुळे व
प्रतिसादामुळे अविरत प्रोत्साहन मिळत आहे. आजपर्यंत दरवर्षी एक लाखाहून अधिक संख्येने
शेतकरी समुदाय किसान प्रदर्शनास भेट देत आहेत.


किसान संवादमागील २१ वर्षांपासून किसान संवाद या नावाने आम्ही एक लहानसे कॉल सेंटर चालवीत आहोत.
किसान प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती येथे संकलित केली जाते. 
आता पर्यंत आम्ही भारतभरातील ५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे.  
किसान प्रदर्शनाची माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे संबंधित लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी,
या माध्यमाचा खूपच चांगला उपयोग होतो.


KISAN.com : कृषि उद्योग क्षेत्रासाठी संकेतस्थळभारतीय शेतकऱ्यांसाठी आपले शेतीतील ज्ञान आणि त्यांनी केलेले नवीनतम प्रयोग मांडण्यासाठी,
किसान.कॉम हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येथे आपण शेतीतील माहितीची व विचारांची
देवाण घेवाण करू शकता.


मोबाईल अॅप्स

शेतकरी आता नवीन तंत्रज्ञानाचा  वापर करीत आहेत. त्यासाठी समान ऑनलाईन मंच सादर केला जाईल. 
या अॅपमुळे त्यांच्या मोबाईल आणि टॅबलेटद्वारे, इंटरनेटच्या माध्यमातून सतत किसानच्या संपर्कात राहू शकतील.  
हे माध्यम शेतकऱ्यांचा संवाद आणि योगदान वाढीसाठी अधिक उपयोगी ठरेल.


पशुधन: भारतीय पशुधन उद्योग प्रदर्शनीपशुधन उद्योगातील भागधारकांना एकत्र आणण्याच्या उद्देश्याने, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.  
भारतातील पशुसंवर्धन क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, नवीन उपक्रम एका व्यासपीठावर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे.

किसान संपर्क  


भारत संपर्क या प्रकल्पांतर्गत, किसान प्रतिनिधी, प्रत्येक वर्षी भारताच्या कानाकोपऱ्यातील
शेती इनपुट वितरक, व्यापारी व शेतकरी यांना प्रत्यक्ष भेट देतात. किसान प्रदर्शनाचे आमंत्रण देऊन,
यंदा प्रदर्शनात काय नवीन आकर्षण असेल याची माहिती पोहोचविण्याचे काम या प्रकल्पाद्वारे करतात.
प्रत्यक्ष भेटून त्यांची माहिती संकलित केली जाते व त्यांना प्रदर्शन भेटीचे मोफत पास पुरविले जातात.

कॉपीराइट © किसान फोरम प्रा. लि.
सर्व हक्क राखीव.